Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Tuesday, 13 June 2017

होली क्रॉस शाळेचा s.s.c.निकाल 100 टक्के

              होली क्रॉस ,निर्मळ    शाळेचा  10 वी चा निकाल 100 टक्के



मार्च 2017 साली झालेल्या s.s.c. परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. आपल्या होली क्रॉस शाळेचा

निकाल 100 टक्के लागला असून सलग 3 वर्षे शाळेचा निकाल 100 टक्के लागत आहे. यंदाचा निकाल म्हणजे

निकालाची हॅट्ट्रीक असून पंचक्रोशीत शाळेचे  अभिनंदन करण्यात येत आहे.

        शाळेचे गुणवंत   विद्यार्थी पुढील प्रमाणे


1) चौधरी योगिता पांडूरंग         -------- 93 /      

2)बोरसे निकीता  तुकाराम      --------- 92.20  /

3) देवकर संजना संतोष    -------------- 91 .40 /

4) म्हात्रे शरयू प्रदिप         --------------  91 /

5) वडके मानसी अरूण      ------------- 91 /

6) करबले पायल  महेश        ------------ 91 /

तसेच   93  विद्यार्थी      distiction मध्ये आले आहेत.

    सर्व यशस्वी विद्यार्थांचे, पालकांचे व त्यांना  मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे  आणि  शाळेचे प्राचार्य रेव्ह.

फा. जॉन कुशेर  ह्यांचे त्रिवार अभिनंदन  !!1


Tuesday, 31 January 2017

सेवानिवृत्ती

होली क्रॉस प्राथमिक शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.सांतान मॅडम ह्या दिनांक 31/01/2017 रोजी 36 वर्षे 8 महिने अध्यापनाचे कार्य करुन सेवानिवृत्त झाल्या.

                तुटलेली फुले सुगंध देऊन जातात
 
                गेलेले क्षण आठवणी देऊन जातात
             
               प्रत्येकाचे अंदाज हे वेगवेगळे असतात

               म्हणूनच काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात


   असचं एक लक्षात राहण्यासारखे व्यक्तिमत्व म्हणजे सौ.सांतान मॅडम की ज्यांनी आपलं पहिलं प्रेम हे शाळेवर केलं  आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची मुले पाहून त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. गेली 36 वर्षे 8 महिने त्यांनी निस्वार्थी ,प्रामाणिकपणे आणि आत्मियतेने  होली क्रॉस शाळेची सेवा केली .आज त्या आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत ,सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसतेच मुळी तर ती असते आवृत्ती ,नव्या जीवनाची ,नव्या वाटचालीची   .मॅडम आजपासून नव्या जीवनाच्या आवृत्तीस सुरवात करणार आहेत .आज मॅडमचा होली क्रॉस संस्थेचे मॅनेजर ,प्राचार्य  रेव्ह .फा.जॉन कुशेर ह्यांच्या हस्ते शाल .भेटवस्तू देऊन यथोचीत सन्मान करून त्यांना गौरविण्यात  आले.

 मॅडम आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नाना  बहर येऊ दे

तुमच्या इच्छा-आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे

मनाच्या आमच्या एकच इच्छा

आपणांस उदंड ,निरोगी आयुष्य लाभू दे !



























 


Sunday, 25 December 2016

वार्षिक क्रीडामहोत्सव

वार्षिक क्रीडा महोत्सव
दि.22 डिसें. रोजी शाळेच्या भव्य पटांगणावर वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्र. पाहुणे म्हणून मा. श्री. मनवेल डायस उपस्थित होते.त्यांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहण करुन क्रीडा स्पर्धेचे औपचारिकरित्या उदघाटन करण्यात. त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून खेळाडूंच्या मनात खेलप्रति नवचैतन्य निर्माण करण्यात आले.
यावेळी m.c.c विद्यार्थाचे संचलन सादर करण्यात आले.
त्यानंतर विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली 
इ. 3री ते 7 वी मार्स ड्रिल ,इ 8 ते 9 वी एरॉबिक्स आणि 9 वी ते 10 वी पिरॅमिड्सचे संचलन करण्यात आले.या सर्व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले शाळेचे माजी विद्यार्थी प्रतीक,भावेश आणि कौस्तुभ .
त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 800 मी ,600मी,200मी आणि 1500 मी आशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या.शेवटी विजेत्या खेळाडूंना मेडल देऊन गौरविन्यात आले.














Tuesday, 6 December 2016

पालक दिन

होली क्रॉस शाळेचा वार्षिक पालक मेळावा शनिवार ,दिनांक 10 डिसेंबर 2016 रोजी संध्या.ठीक 5.00 वाजता संपन्न होत आहे.हया सदाबहार कार्यक्रमात निवृत्त शिक्षक, 25 वर्षे सेवा झालेले शिक्षक ,शाळेचे माझी विद्यार्थी -डॉक्टर व सी.ए झालेले  माझी विद्यार्थी,गुणवंत  विद्यार्थी या सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल असणार आहे
ह्या सदाबहार कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि कलाकार विद्दार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणांस आग्रहाचे आमंत्रण !