Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Saturday 28 October 2017

शैक्षणिक सहल






दापोली येथे कल्याणकारी शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या सहलीचा व्हिडिओ

    

  



















शैक्षणिक व्हिडिओ - शब्दांच्या जाती


    

Friday 29 September 2017

सेवानिवृत्ती












  • सेवानिवृत्ती



होली क्रॉस शाळेचे जेष्ठ शिक्षक  आॅस्कर डिमेलो सर हे दिनांक 30/09/2017 रोजी 27 वर्षे 3 महिने अध्यापनाचे कार्य करुन सेवानिवृत्त  होत आहेत..

        तुटलेली फुले सुगंध देऊन जातात
        
                गेलेले क्षण आठवणी देऊन जातात
             
               प्रत्येकाचे अंदाज हे वेगवेगळे असतात

               म्हणूनच काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात


   असचं एक लक्षात राहण्यासारखे व्यक्तिमत्व म्हणजे आॅस्कर सर की ज्यांनी शाळा म्हणजे आपले कुुटुंब समजून मुलांना  घडवण्याचा प्रयत्न केला. गेली 27 वर्षे 3 महिने त्यांनी निस्वार्थी ,प्रामाणिकपणे आणि आत्मियतेने  होली क्रॉस शाळेची सेवा केली .आज ते आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत ,सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसतेच मुळी तर ती असते आवृत्ती ,नव्या जीवनाची ,नव्या वाटचालीची .सर आजपासून नव्या जीवनाच्या आवृत्तीस सुरवात करणार आहेत .
      आॅस्कर सर म्हणजे नावाप्रमाणे आॅस्कर असलेले ,शांत ,,मनमिळावू ,ज्ञानी ,वक्तशीर आणि स्वच्छता प्रिय .
सर आपल्या होली क्रॉस शाळेत 11 जुन 1990 साली रुजू झाले आणि 27 वर्षाची प्रदिर्घ सेवा करून होली क्रॉस संस्थेतून  निवृत्त होत आहेत

सरांचा स्वभाव शांत त्यामुळे ते कधी मुलांवर रागवत नसत किंबहुना  सरांना कधी आपल्या सहकारी शिक्षकांवर  रागावलेले मी कधी पाहिले नाही
गणित व सायन्स हे विषय सरांचे आवडते . आपला विषय अगदी सोप्या पध्दतीने शिकवण्यात सरांचा हातखंडा . गणितातील समिकरणे , सुत्रे ,प्रमेय  सामान्य विद्धार्थांना  पटकन समजत  त्यामुळे त्यांची  गणिताविषयाची भीती नाहीशी होत असे  त्यामुळेच आॉस्कर सर विद्धार्थी प्रिय  झाले होते . आणी यामुळेच  शालेय परिसरात विद्धार्थांचा गराडा नेहमीच त्यांच्या भोवती पडलेला असे ...
 .

  सर  आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नाना  बहर येऊ दे

तुमच्या इच्छा-आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे

मनाच्या आमच्या एकच इच्छा

आपणांस उदंड ,निरोगी आयुष्य लाभू दे !
हीच त्या विधात्याकडे प्रार्थना  ........

Tuesday 15 August 2017

स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा





















आज आपल्या होली क्रॉस शाळेत भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    शाळेच्या इतिहासात प्रथमच  सीमेवर तैनात असलेल्या आपल्या एका लष्करी जवान बंधूकडून ध्वजारोहन

करण्यात  आले .ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट  आहे .

   या वेळी शाळेचे प्राचार्य रेव्ह. फा. ज्यो आल्मेडा , इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य रेव्ह. फा.  Henri  परेरा ,शाळेचे

उपप्राचार्य जॉन सर आणि प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ऍनी मॅडम  व इतर मान्यवर उपस्थीत होते.

Tuesday 13 June 2017

होली क्रॉस शाळेचा s.s.c.निकाल 100 टक्के

              होली क्रॉस ,निर्मळ    शाळेचा  10 वी चा निकाल 100 टक्के



मार्च 2017 साली झालेल्या s.s.c. परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. आपल्या होली क्रॉस शाळेचा

निकाल 100 टक्के लागला असून सलग 3 वर्षे शाळेचा निकाल 100 टक्के लागत आहे. यंदाचा निकाल म्हणजे

निकालाची हॅट्ट्रीक असून पंचक्रोशीत शाळेचे  अभिनंदन करण्यात येत आहे.

        शाळेचे गुणवंत   विद्यार्थी पुढील प्रमाणे


1) चौधरी योगिता पांडूरंग         -------- 93 /      

2)बोरसे निकीता  तुकाराम      --------- 92.20  /

3) देवकर संजना संतोष    -------------- 91 .40 /

4) म्हात्रे शरयू प्रदिप         --------------  91 /

5) वडके मानसी अरूण      ------------- 91 /

6) करबले पायल  महेश        ------------ 91 /

तसेच   93  विद्यार्थी      distiction मध्ये आले आहेत.

    सर्व यशस्वी विद्यार्थांचे, पालकांचे व त्यांना  मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे  आणि  शाळेचे प्राचार्य रेव्ह.

फा. जॉन कुशेर  ह्यांचे त्रिवार अभिनंदन  !!1


Tuesday 31 January 2017

सेवानिवृत्ती

होली क्रॉस प्राथमिक शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.सांतान मॅडम ह्या दिनांक 31/01/2017 रोजी 36 वर्षे 8 महिने अध्यापनाचे कार्य करुन सेवानिवृत्त झाल्या.

                तुटलेली फुले सुगंध देऊन जातात
 
                गेलेले क्षण आठवणी देऊन जातात
             
               प्रत्येकाचे अंदाज हे वेगवेगळे असतात

               म्हणूनच काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात


   असचं एक लक्षात राहण्यासारखे व्यक्तिमत्व म्हणजे सौ.सांतान मॅडम की ज्यांनी आपलं पहिलं प्रेम हे शाळेवर केलं  आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची मुले पाहून त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. गेली 36 वर्षे 8 महिने त्यांनी निस्वार्थी ,प्रामाणिकपणे आणि आत्मियतेने  होली क्रॉस शाळेची सेवा केली .आज त्या आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत ,सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसतेच मुळी तर ती असते आवृत्ती ,नव्या जीवनाची ,नव्या वाटचालीची   .मॅडम आजपासून नव्या जीवनाच्या आवृत्तीस सुरवात करणार आहेत .आज मॅडमचा होली क्रॉस संस्थेचे मॅनेजर ,प्राचार्य  रेव्ह .फा.जॉन कुशेर ह्यांच्या हस्ते शाल .भेटवस्तू देऊन यथोचीत सन्मान करून त्यांना गौरविण्यात  आले.

 मॅडम आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नाना  बहर येऊ दे

तुमच्या इच्छा-आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे

मनाच्या आमच्या एकच इच्छा

आपणांस उदंड ,निरोगी आयुष्य लाभू दे !