Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Tuesday 27 November 2018

Bhasha Sangam


विषय : “एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत -"भाषा संगम"
                      कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत.

💠1) भारत सरकारने राष्ट्रीय
एकात्मता वाढीसाठी “एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB)” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने *दि.२० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८* या कालावधीत *“भाषा संगम”* हा उपक्रम सर्व शाळांमधे सर्व भारतीय भाषांबद्दल अधिक प्रेम व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने घ्यावयाचा आहे.
     
💠2)देशातील २२ भाषांमधील सामान्यत: बोलली जाणारी पाच साधी वाक्ये परीपाठामधे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावयाची आहेत. यासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका      https://goo.gl/PfNDUu   या लिंकवर उपलब्ध आहे.

 💠3)“भाषा संगम” अंतर्गत घ्यावयाच्या उपक्रमाचे वेळापत्रक माहिती पुस्तिकेच्या (पान क्र II ) वर दिले असून पुढीलप्रमाणे कृतिकार्यक्रम घ्यावा.
   i) ज्या तारखेला  जी भाषा संवादासाठी सुचवली आहे, त्या भाषेची ५ वाक्ये परिपाठात वाचावीत. (उदा. दिवस पहिला - असामी, दिवस दुसरा - बंगाली) शिक्षक, पालक, शासकीय कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांना अशी वाक्ये वाचण्यासाठी निमंत्रित करावे .
 ii) काही विद्यार्थ्यांना या वाक्यांवर  आधारित भित्तीपत्रके (posters) तयार करण्यास सांगावीत व तयार केलेली भित्तीपत्रके शाळेमध्ये सर्वत्र लावावीत. व या संदर्भाने इतर काही पुरक उपक्रम घ्यावेत.

 💠4) सोबत दिलेल्या माहिती पुस्तिकेच्या पान क्र.V वरील मुद्दा क्र. 3 ( i ते xii ) नुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत राबवलेल्या दैनंदिन कार्यक्रम व उपक्रमांचे videos, photoes “Bhasha sangam youtube channel” वर दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत.

💠5) या उपक्रमासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्राचार्य DIECPD यांनी काम पहातील.
जिल्हा नोडल अधिकारी यांनी वरील माहितीचे दिनांकनिहाय संकलन करून या कार्यालयाच्या  marathilangdept@maa.ac.in  या इमेलवर दररोज  पाठवावी.

💠6) क्षेत्रीय स्तरावर कार्यरत सर्व अधिकाऱ्यांनी “भाषा संगम” कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने शाळाभेटी कराव्यात.

👉अधिक माहितीसाठी उपक्रमाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.जगराम भटकर (उपसंचालक भाषा विभाग) (९४२३७२८४८६) यांच्याशी संपर्क करावा.


 संगम या Youtube  Channel वरती व्हिडिओ अपलोड करण्याची प्रक्रिया

भाषा संगम कार्यक्रमांतर्गत दिनांक २० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८ दरम्यान घेतलेल्या दैनंदिन उपक्रमांचे व्हिडिओ भाषा संगम Youtube channel वरती अपलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी.


➡️सर्वप्रथम भाषा संगम  Youtube channel  - https://www.yotube.com/ ब्राउज करा. यामुळे Youtube ओपन होईल.यामध्ये पुढील ई-मेल आय डी व पासवर्ड चा वापर करून sign in करावे.

ई-मेल आयडी - rangotsav@ncert.nic.in

👉पासवर्ड -  Ciet@321#*

➡️यानंतर  भाषा संगम Youtube channel  ओपन होईल.यावरील उजव्या बाजूस असलेल्या create or post video या icon वर क्लिक करावे.

➡️यामधील upload video या icon वर क्लिक करून select files to upload  वर क्लिक करून आपल्या computer/ mobile मधील अपलोड करावयाची व्हिडिओ फाईल निवडून ok या बटणावर क्लिक करावे.

➡️यानंतर संबंधित व्हिडिओ बाबतची प्राथमिक माहिती (Title,description,tags) इ. भरावी.

➡️यानंतर advanced setting या icon वरती जाऊन Creative commons license वरती क्लिक करावे यामध्ये पुन्हा Publish icon वरती क्लिक केल्यावर आपला व्हिडिओ अपलोड होईल.

यानंतर  Youtube channel  वरून sign out व्हावे.

आपण अपलोड केलेला व्हिडीओ पाहण्यासाठी पुन्हा sign in होण्याची गरज नाही.केवळ Youtube वर Bhasha Sangam search करावे.