Pages

माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व शिक्षकांचे ,पालक वर्गाचे तसेच शाळेचे माजी विद्दार्थी या सर्वांचे सहर्ष स्वागत.या ठिकाणी आपल्याला शाळेतील चालू घडामोडीविषयी माहीती ,उपक्रम आणि फोटो पहायला मिळतील.माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

शाळेचे प्राचार्य


फादर फ्रान्सिस मस्करणीस, प्राचार्य म्हणून होली क्रॉस हायस्कूल,निर्मळ येथे १९७८ च्या फादर फ्रान्सिस मस्करणीस, प्राचार्य म्हणून होली क्रॉस हायस्कूल,निर्मळ येथे १९७८ च्या जून मध्ये आले.फादर असून खेळात रस घेणारे व विद्यार्थ्याबरोबर खेळणारे ते वसईतील एकमेव असावेत! फादर स्वतः फुटबॉलचे शौकीन होते.ते येण्यापूर्वी शाळेतील खेळाचा तास हा इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असतो असे समजले जाई. फादरांनी तो समज नाहीसा करून टाकला.खेळाच्या तासाला तर मुले ग्राउंड वर जायचीच परंतु शाळा सुटल्यानंतरही खेळायला थांबायची परंपरा फादरांनी सुरू केली. शाळेत वर्षातून एकदा मोठा क्रीडा महोत्सव त्यांनीच सुरू केला.या क्रीडा महोत्सवाच्या तयारीत सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी होत. अभ्यासापेक्षा विविध क्रीडा प्रकारांचा सराव  करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू असे. प्रत्यक्ष क्रीडा महोत्सवाच्या दिवशी सर्वांच्या उत्साहाला उधाण येई.ग्राउंड वर स्पर्धा सुरू असताना त्यांची अनाउन्समेंट स्पीकरवरून शामियान्यातून केली जाई. फादर स्वतः सर्वत्र संचार करीत असत. तेव्हा पासून क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम शाळेचा एक अविभाज्य भाग होऊन राहिला आहे! त्यामुळेच होली क्रॉस हायस्कूलचे विद्यार्थी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत चमकू लागले!
              खेळाप्रमाणेच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देणे हे फादरांचे खास वैशिष्ट्य! शाळेतील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना ते नावानिशी ओळखत.एवढी चांगली स्मरणशक्ती असलेली व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात दुसरी नाही.शाळा सोडून अनेक वर्षे झाल्यानंतरही भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्याला ते त्याचे नाव विचारत नसत तर त्याचे नाव सांगत असत! विद्यार्थी शाळेत गैरहजर असला तर त्याच्या घरी स्कूटर घेऊन फादर पोहोचत.निर्मळ,वाघोली,कळंब,भुईगाव गास येथून गैरहजर राहणाऱ्या मुलांची घरे फादरांना पाठ होती! गैरहजर राहणाऱ्या मुलांची लपण्याची ठिकाणेही फादरांना माहिती होती.
                     अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या फादरांनी शाळेतील मुलांची व शिक्षकांची हजेरीच वाढवली नाही तर परीक्षेतील कॉपी प्रकरणावर जबरदस्त वचक बसवला. परीक्षेत कॉपी पकडण्यासाठी शिक्षकांचे पथक करून परीक्षा हॉलमध्ये चेकिंग सुरू केली.कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्याला त्या पेपरमध्येच नव्हे तर संपूर्ण परीक्षेत नापास करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला! अर्थात त्यामुळे अनेक वेळा मनस्तापही त्यांना सहन करावा लागला.
                      वाचनाची त्यांना फारशी आवड नव्हती. परंतु एकदा शाळेत मार्गदर्शन करण्यासाठी मणेरीकर सर आले होते त्यांनी सांगितले की "वाचाल तरच वाचाल".हे त्यांचे शब्द त्यांना इतके भावले की त्यांनी शाळेच्या वाचनालयाकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यायला सुरुवात केली!वाचनालयाचा तास ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक निवडता येईल अशी सोय केली.मुलांची वाचनाची आवड वाढली तशी शाळेच्या एसीसी च्या निकालात वाढ होत गेली!
                       फादरांचे आर्थिक व्यवहारही पूर्णपणे स्वच्छ व पारदर्शक असत. शाळेचे सर्व आर्थिक व्यवहार मॅनेजर फादर एडविन कुलासो हे पहात.त्यांच्या खिशात मुलांना देण्यासाठी चणे कुरमुरे फक्त असत!
                     त्यांच्या प्रयत्नामुळेच शाळे पुढे मोठे क्रीडांगण झाले, शाळेची गुणवत्ता वाढल्याने विद्यार्थ्यांची संख्याही वाढली.त्यासाठी शाळेचा मजला वाढवून इमारतीची उंचीही वाढवावी लागेली.
                    त्यांच्या काळातच एस एस एस सी परीक्षेचे मुख्य केंद्र होली क्रॉस हायस्कूल मध्ये सुरू झाले.
                   फादरांच्या चार वर्षाच्या काळात होली क्रॉस हायस्कूल ही वसईतील एक नामांकित शाळा झाली.त्याचे सर्व श्रेय त्यांच्या अथक परिश्रमाला,शिस्तप्रियतेला व दूरदृष्टीला आहे!
                  फादरांची निर्मळहून बदली झाल्यानंतर देखील शाळेतील कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे त्यांचे स्नेहसंबंध अबाधित होते!
                 *जून मध्ये आले.फादर असून खेळात रस घेणारे व विद्यार्थ्याबरोबर खेळणारे ते वसईतील एकमेव असावेत! फादर स्वतः फुटबॉलचे शौकीन होते.ते येण्यापूर्वी शाळेतील खेळाचा तास हा इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असतो असे समजले जाई. फादरांनी तो समज नाहीसा करून टाकला.खेळाच्या तासाला तर मुले ग्राउंड वर जायचीच परंतु शाळा सुटल्यानंतरही खेळायला थांबायची परंपरा फादरांनी सुरू केली. शाळेत वर्षातून एकदा मोठा क्रीडा महोत्सव त्यांनीच सुरू केला.या क्रीडा महोत्सवाच्या तयारीत सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी होत. अभ्यासापेक्षा विविध क्रीडा प्रकारांचा सराव  करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू असे. प्रत्यक्ष क्रीडा महोत्सवाच्या दिवशी सर्वांच्या उत्साहाला उधाण येई.ग्राउंड वर स्पर्धा सुरू असताना त्यांची अनाउन्समेंट स्पीकरवरून शामियान्यातून केली जाई. फादर स्वतः सर्वत्र संचार करीत असत. तेव्हा पासून क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम शाळेचा एक अविभाज्य भाग होऊन राहिला आहे! त्यामुळेच होली क्रॉस हायस्कूलचे विद्यार्थी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत चमकू लागले!
              खेळाप्रमाणेच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देणे हे फादरांचे खास वैशिष्ट्य! शाळेतील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना ते नावानिशी ओळखत.एवढी चांगली स्मरणशक्ती असलेली व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात दुसरी नाही.शाळा सोडून अनेक वर्षे झाल्यानंतरही भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्याला ते त्याचे नाव विचारत नसत तर त्याचे नाव सांगत असत! विद्यार्थी शाळेत गैरहजर असला तर त्याच्या घरी स्कूटर घेऊन फादर पोहोचत.निर्मळ,वाघोली,कळंब,भुईगाव गास येथून गैरहजर राहणाऱ्या मुलांची घरे फादरांना पाठ होती! गैरहजर राहणाऱ्या मुलांची लपण्याची ठिकाणेही फादरांना माहिती होती.
                     अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या फादरांनी शाळेतील मुलांची व शिक्षकांची हजेरीच वाढवली नाही तर परीक्षेतील कॉपी प्रकरणावर जबरदस्त वचक बसवला. परीक्षेत कॉपी पकडण्यासाठी शिक्षकांचे पथक करून
   
परीक्षा हॉलमध्ये चेकिंग सुरू केली.कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्याला त्या          


 पेपरमध्येच नव्हे तर संपूर्ण परीक्षेत नापास करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला! अर्थात त्यामुळे अनेक वेळा मनस्तापही त्यांना सहन करावा लागला.
                      वाचनाची त्यांना फारशी आवड नव्हती. परंतु एकदा शाळेत मार्गदर्शन करण्यासाठी मणेरीकर सर आले होते त्यांनी सांगितले की "वाचाल तरच वाचाल".हे त्यांचे शब्द त्यांना इतके भावले की त्यांनी शाळेच्या वाचनालयाकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यायला सुरुवात केली!वाचनालयाचा तास ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक निवडता येईल अशी सोय केली.मुलांची वाचनाची आवड वाढली तशी शाळेच्या एसीसी च्या निकालात वाढ होत गेली!
                       फादरांचे आर्थिक व्यवहारही पूर्णपणे स्वच्छ व पारदर्शक असत. शाळेचे सर्व आर्थिक व्यवहार मॅनेजर फादर एडविन कुलासो हे पहात.त्यांच्या खिशात मुलांना देण्यासाठी चणे कुरमुरे फक्त असत!
                     त्यांच्या प्रयत्नामुळेच शाळे पुढे मोठे क्रीडांगण झाले, शाळेची गुणवत्ता वाढल्याने विद्यार्थ्यांची संख्याही वाढली.त्यासाठी शाळेचा मजला वाढवून इमारतीची उंचीही वाढवावी लागेली.
                    त्यांच्या काळातच एस एस एस सी परीक्षेचे मुख्य केंद्र होली क्रॉस हायस्कूल मध्ये सुरू झाले.
                   फादरांच्या चार वर्षाच्या काळात होली क्रॉस हायस्कूल ही वसईतील एक नामांकित शाळा झाली.त्याचे सर्व श्रेय त्यांच्या अथक परिश्रमाला,शिस्तप्रियतेला व दूरदृष्टीला आहे!
                  फादरांची निर्मळहून बदली झाल्यानंतर देखील शाळेतील कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे त्यांचे स्नेहसंबंध अबाधित होते!
                 *


शाळेचे प्राचार्य
















* रेव्ह. फा.जोसेफ व्हिक्टोरीया


1958 मध्ये निर्मळकरांचे भाग्य उजळले .फादर जोसेफ व्हिक्टोरीया निर्मळला आले .होली क्रॉसला चर्चला फादर लाभले. चर्च मध्ये केवळ धर्म वचने सांगणे ऐवढ्या मर्यादितच न राहता समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली .


स्व. फा. जोसेफ व्हिक्टोरीया ह्या ऋषीतुल्य धर्मगुरुने हा परिसर पाहिला .सर्व प्रकारचा अंधकार पाहून त्यांचे हृदय हेलावले . ज्ञानाचा दिप प्रज्वलीत केल्याशिवाय निर्मळ सारखे खेडे उजळून निघणार नाही.हे त्यांनी जाणले .तहान भूक विसरुन रात्रीचे दिवस करुन ,रक्त,घाम आणि अश्रुंचे शिंपन करुन शाळेची इमारत उभी केली


ते स्वतः B.A .BTअसल्याने त्यांना शाळा चालविण्याचा बराच अनुभव होता .त्यांनी स्वतःच्या राहण्याच्या जागेत प्रथम वर्ग सुरू केला .त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून शाळेसाठी मदत मागण्यासाठी काखेत झोळी अडकवली. फादर हटले नाहीत. त्यांच्या जवळ असलेले रु.150 हे त्यांना दिड लाखाहून अधिक वाटले.सर्व जनता फादरांच्या पाठीशी उभी राहिली. फादर व्हिक्टोरीया यांनी हायस्कूल स्थापन करण्याचा निर्णय घेतला .प्रगती करत विद्धार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले .आणि अल्पावधीत शाळेचे नाव ठाणे जिल्हात पसरविले .










** बिशप डॉमणिक आब्रियो


1 जून 1964 साली होली क्रॉस शाळेचे भाग्य बदलविणारे फा .डॉमणिक आब्रियो यांचे शुभागमन झाले .ते आले ,त्यांनी पाहिलेआणि त्यांनी जिंकले असेच वर्णन करावे लागेल. निर्मळला फा.आब्रियोंचे आगमन हे एक वरदान ठरले .एक शैलीदार साहित्यिक,गाढे अभ्यासक, थोर विचारवंत,पट्टीचे वक्ते ,उत्कृष्ट प्रशासक,कुशल संघटक असे हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होत. बिशप डॉमणिक आब्रियो ह्यांचा जन्म जरी माणिकपूर येथे झाला असला ,तरी त्यांचे मूळ घराणे भुईगावचे .माणिकपूर येथे प्राथमिक ,तर पापडी येथील थॉमस बाप्टीस्टा हायस्कूल येथे त्यांचे शिक्षण पुर्ण झाले .उपजत कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे त्या वेळेला ग्रामीण भागात दुर्मिळ असलेली सरकारी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली.एक दोन वर्षे त्यांनी नोकरी केली.,तोच त्यांच्या धार्मिक मनाने उचल खाल्ली .5 डिसेंबर 1954 रोजी माउंट मेरी चर्च वांद्रे येथे कार्डिनल ग्रेशस यांच्या शुभहस्ते त्यांना धर्मगुरुची दीक्षा देण्यात आली.तब्बल तेरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत सहाय्यक प्रमुख धर्मगुरु ,होली क्रॉस हायस्कूलचे प्राचार्य व सुवार्ताचे संपादक अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडली .फादर स्वतःत्या काळचे एम .ए व मराठी विषयाचे साहित्याचार्य .त्यांनी हा हा म्हणता शाळेचा आणि सबंध निर्मळ धर्मग्रामाचा कायापालट करुन टाकला .त्यांनी आपल्या कसदार नेतृत्वाने तरुणांची मने जिंकून घेतली. फा. आब्रियोंनी तेरा वर्षे धडाडीचे कार्य करुन निर्मळ धर्मग्राम आपली कर्मभुमी करुन सोडली. या तेरा वर्षात त्यांनी शाळेची इमारत पुर्ण बांधलीच परंतु प्रशस्त खुले नाट्यगृह ,भव्य अत्याधुनिक सायन्स हॉल लॅब लायब्ररी निर्माण करुन कुशल प्रशासक असल्याचे दाखवून दिले .त्यांच्याच कारकिर्दीत शाळेची भरभराट होऊन शाळेची कीर्ती चौफेर पसरली .फा व्हिक्टोरीया यांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे संवर्धन फा. डिआब्रियो यांनी केले.म्हणून आज त्याचे रुपांतर मोठ्या वृक्षात झाले आहे. 13 वर्षाच्या कालावधीत निर्मळचा कायापालट करताना फादरांनी अनेक कुटुंबातील हेवेदावे मिटवले. जमिनीवरुन ,घराच्या वाटणीवरुन निर्माण झालेले तंटे त्यांनी योग्य न्याय करुन मिटविले. आयुष्याच्या अखेरची 9 वर्षे ते औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप म्हणून काम पाहात होते. बिशप डॉमणिक आब्रियो 1 मे 1987 रोजी वयाच्या अवघ्या 63 व्या वर्षी अकाली निखळून पडले.






फादर टोनी कोरीया


1 जून 1986 साली फादर टोनी कोरीया ह्यांची बदली निर्मळ येथे झाली . येथे आल्यावर त्यांनी प्राचार्या पदाचा ताबा घेतला .निर्मळला आल्यानंतर शाळेचा महोत्सव साजरा करण्याचा मोठा प्लॅन त्यांनी आखला .प्राचार्य टोनींनी प्रयोगशाळेचे अत्याधुनिकीकरण केले. वाचनालयासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पुस्तकांचे अवांतर वाचन, वेगवेगळ्या स्पर्धेतील सहभाग ,उल्लेखनीय कामगिरी ,प्रामाणिकपणा ,इयत्तावर आदर्श विद्दार्थी –गौरव ,वर्षभरात प्रत्येक वर्गाच्या प्रार्थना सभेत उत्कृष्ट आयोजन करणा-या वर्गाला बक्षीस देणे .इत्यादी नवनवीन उपक्रम राबवून विद्दार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला.शाळेसाठी मैदानाची जागा खरेदी करण्याचा व्यवहार झाला होता .त्या संपुर्ण जागेला संरक्षण भिंत बांधण्याचे काम फा.टोनी ह्यांनी केले. पालक दिन ,वार्षिक क्रिडामहोत्सव भव्यदिव्य व्हावा यासाठी ते स्वतःप्रयत्नशील असत.खेळ,कला,विविध स्पर्धा ह्यासाठी विद्दार्थ्याची निवड


ते स्वतः करीत .त्यांचा जून 1986 ते मे 1993 चा काळ ख-या अर्थाने शाळेसाठी सुवर्णकाळ होता. कोणत्याही कामासाठी पैसा कमी पडू दिला नाही. त्यांनी पालक शिक्षक संघटनेची स्थापना केली. बोर्डाचा निकाल जो 60-65 रेंगाळत होता.तो 90-95 टक्केपर्यंत पोहचला आणि त्यामुळेच शाळेचे नाव नालासोपारा परिसरात घुमू लागले.


मॉन्सिनियर फा.फ्रान्सिस कोरीया


फादरांनी अल्पशा कार्यकाळात विद्यादानाचे कार्य केले. साहित्यिक आवड असल्याने’ सुवार्ता ‘ मासिकाच्या प्रसाराचे कार्य केले .शाळेचा व संस्थेचा इतिहास त्यांना मुखोदगत आहे. 1967-68 साली धर्मगुरु दीक्षा मिळाल्यावर पहिली नेमणूक होली क्रॉस शाळेत सहाय्यक म्हणून झाली. फा.आब्रियो संपुर्ण वर्षभर मुंबईला बी.एड साठी वास्तव्याला असल्याने फादरांनी वर्षभर ‘ प्रभारी मुख्याध्यापक ‘ म्हणून काम पाहिले. शाळेचा रंगमंच फादर कोरीया ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आला आहे. ते चांगले इतिहास संशोधक असून सामवदी बोलीभाषा ह्या विषयावर विपूल लेखन केले आहे. फादर कोरीया जसे पट्टीचे प्रवचनकार आहेत तसेच ते कसदार लेखक आहेत.






फा. विल्सन रिबेलो


जून 1999 मध्ये फा.विल्सन रिबेलो हे होली क्रॉस हायस्कूल मध्ये प्राचार्यपदी आले. बिशप आब्रियो नंतर खर्‍या अर्थाने दूरदृष्टी असलेले ते प्राचार्य होते. सुरुवातीला त्यांनी शाळेच्या इमारतीच्या पूर्वेला मुला-मुलींसाठी वेगवेगळे भव्य असा प्रसाधनगृह आणि स्वतंत्र जिन्याचे काम केले. त्यानंतर शाळेच्या हॉलच्या दुरुस्तीचे काम त्यांनी हाती घेतले. 6 महिन्यात रु.7 लक्ष निधी जमवून फा.विल्सन ह्यांनी त्या हॉलला अत्याधुनिक स्वरुप दिले.शेवटी मुख्य इमारतीच्या समोर संपूर्ण पटांगणाचे कॉन्करीटिकरण केले.


फा.विल्सन ह्यांच्या काळात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे निर्मळ परिसरातील लोकांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणे. वसई धर्मप्रांताची इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा जून 2001 मध्ये त्यांनी सुरु केली. त्यांची निर्मळहून पापडी येथे बदली झाली.या ठिकाणी उत्तम सेवा करुन ते निवृत्त झाले.इंग्रजी माध्यमाची शाळा वाढत होती तिचा वाढता व्याप लक्षात घेऊन त्यांची निर्मळला इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य व मॅनेजर अशी दुहेरी जबाबदार देण्यात आली,आणि पुन्हा एकदा विकासात्मक कामाला वेग आला.




No comments:

Post a Comment